Devendra Fadnavis latest News: “मी २५ वर्ष राजकारणात आहे. कर्तव्यपूर्ती केल्यानंतर जनतेने आमचे आभार मानन्याचा निर्णय घेतला. २५ वर्षांत मी हे पहिल्यांदा पाहतोय की, ज्यांच्यासाठी काम केले, ते लोक आभार मानन्यासाठी पुन्हा बोलवत आहेत. कारण राजकारण असा धंदा आहे, जिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खाण्याची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता. कारण या शिव्या नसतात तर सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात”, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ‘वीजनिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती खापरखेडा’तर्फे भव्य कामगार मेळावा आणि सत्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

“वीज कंत्राटी कामगारांचे कल्याण करायचे असेल तर बावनकुळे-फडणवीस जोडी असेल तरच हे कल्याण होऊ शकते. २०१९ साली चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्मय घेतला होता. ज्यामुळे कंत्राटी कामगारांचा फायदा झाला. आताही बावनकुळे यांनीच पुढाकार घेतल्यामुळे कंत्राटी कामगाराचा लाभ होत आहे. ऊर्जा खाते चालवत असताना बावनकुळेच माझे मार्गदर्शक आहेत”, असूही विधान देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमादरम्यान केले.

हे वाचा >> Nitin Gadkari: ‘मतदारांनी मत दिले नाही तर एका मिनिटांत सरळ होतील’, नितीन गडकरींच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या

वीज प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन करता करता बावनकुळे जिल्हा परिषदेत गेले, मग आमदार झाले आणि नंतर मंत्रीही झाले, असे कौटुकही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आमच्या योजनांमुळे विरोधकांना पोटदुखी

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. तसेच लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचे सहकारी उच्च न्यायालयात गेले आहेत, असे सांगितले. आमच्या बहि‍णींची योजना बंद करायची भाषा कराल, तर पुढचे पाच वर्ष सोडाच पण २५ वर्ष तुम्ही सत्तेत येणार नाहीत, असा दावा फडणवीस यांनी केला. आम्ही जर महिलांसाठी, बहि‍णींसाठी योजना देत असू तर तुम्हाला पोटदुखी होण्याचे कारण काय? असाही सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मसणात गेलात तरी तिथे मिडिया असतो

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षणाविरोधात भूमिका मांडली. त्यांना वाटले आपण दुसऱ्या देशात बोललो तर कुणाला कळणार नाही. पण आजकाल मसणातही मिडिया असतो. हे त्यांना बहुधा माहीत नसावे. त्यांनी आरक्षण कसे बंद करणार, याबाबतचा कार्यक्रम सांगितला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.