लोकसत्ता टीम

बुलढाणा : महावितरणची ‘लाईन गुल’ झाल्याने मतदान कर्मचाऱ्यांना चक्क मोबाईल टॉर्चच्या अपुऱ्या प्रकाशात मतदानाची पूर्व तयारी करावी लागली. यामुळे त्यांच्या आराम व झोपेचे ही खोबरे झाले!

ही संतापजनक घटना जिल्ह्याच्या सीमावर्ती वा दुर्गम भागात झाली असेही नाही,तर ती चक्क प्रशासन व महावितरणचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात घडली. स्थानिय इकबाल नगर भागातील उर्दू माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्रात हा संतापजनक प्रकार घडला. या ठिकाणी १५९ ते १६३ क्रमांकाची मतदान केंद्रे आहेत. केंद्राला किमान ५ हजार मतदार जोडले आहे.

आणखी वाचा-अमरावतीत काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले, केंद्रांवर रांगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान साहित्यासह सुमारे २५ कर्मचारी पोहोचले तेंव्हा वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे केंद्राध्यक्ष, २ मतदान अधिकारी, सहायक यांना मोबाईल च्या टॉर्च सुरू करून अंधुक प्रकाशात मतदानाची तयारी करावी लागली. यावर कळस म्हणजे आज सुरू असलेल्या मतदान दरम्यान देखील विजेचा लपंडाव सुरू होता. यामुळे अपुऱ्या प्रकाशात व उकाड्यात कर्मचाऱ्यांना काम करावे लागले.तसेच मतदारांची देखील असुविधा झाली. यासंदर्भात तक्रारी करूनही वीज वितरण चे कर्मचारी आले नसल्याचा आरोप होत आहे.