नागपूरमधून विधानपरीषदेसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपाने आज नागपुरात शक्तिप्रदर्शन केले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. भाजपाने विधानपरीषदेचे काम करण्याची जबाबदारी दिल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचे आभार मानले. तसेच विदर्भ आणि नागपूरातील प्रश्न महाराष्ट्र  विधानपरीषदेत मांडणार असल्याचे सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा  विधानपरीषदेत येत आहेत. त्यांनी मंत्री म्हणून उत्तम काम केलं आहे. तसेच एक जागरूक लोक प्रतिनिधी कसा असतो, हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे. गेल्या दोन वर्षात पक्षाचे महामंत्री म्हणून अतिशय चांगल काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे. 

भाजपा नेते विनोद तावडे यांची भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बाब आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याला राष्ट्रीय महामंत्री पदाचा मान मिळाला आहे

हेही वाचा – पक्षांतर करून आलेल्यांना भाजपची विधान परिषदेची उमेदवारी

चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी २०१९ मध्ये नाकारण्यात आली होती. मात्र त्यांना नंतर प्रदेश सरचिटणीसपद देण्यात आले. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे निकटवर्ती असलेल्या बावनकुळे यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presence of devendra fadnavis and nitin gadkari chandrashekhar bawankule filed the nomination form legislative council srk
First published on: 22-11-2021 at 13:01 IST