नागपूर : वाडी परीसरातील ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या नराधम वसंता दुपारे याची फाशीची शिक्षा अटळ असून राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे. राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे.

३ एप्रिल २००८ साली वसंता संपत दुपारे याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीला घरात नेऊन अमानुष बलात्कार केला होता. आपले पाप उघडकीस येऊ नये म्हणून मुलीचा दगडाने ठेचून खून केला होता. या प्रकरणात त्याला २०१० साली नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा – चंद्रपूर : ‘अंबुजा, अदानी परत जा’, जनसुनावणीमध्ये प्रकल्पग्रस्तांची सिमेंट कंपनीविरोधात घोषणाबाजी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर वसंता दुपारेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्याची याचिका फेटाळली होती. तसेच ३ मे २०१७ रोजी पुनर्विलोकन याचिकादेखील फेटाळत त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. अखेरचा पर्याय म्हणून त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती.

हेही वाचा – मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी, पण लाभ कोणाला मिळणार? वाचा सविस्तर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात राष्ट्रपती सचिवालयाला २८ मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिप्राय प्राप्त झाला होता. त्याच्या कृत्यातील क्रूरता व त्यामुळे समाजमनावर झालेला आघात पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वसंताची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्याला फाशी होणार हे अटळ आहे. आता त्याला फासावर कधी चढवल्या जाणार याकडे संपूर्ण नागपुरकरांचे लक्ष लागले आहे.