लोकसत्ता टीम
वाशीम: रस्त्यावर उभ्या ट्रकला भरधाव खासगी बसने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चालक आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा मालेगाव-मेहकर मार्गावरील वडप गावाजवळ घडली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सदवरून पुण्याला प्रवासी घेऊन जात असलेल्या खासगी बसने (क्र.पी वाय ०५ ई १९५८) मालेगाव तालुक्यातील मेहकर मार्गावरील वडप फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम एच ३४ बी जी ७४५८) जोरदार धडक दिली. यामध्ये मंगेश शेषराव तिखे (रा. वाघजाळी वाशीम), अजय भारत शेलकर (रा. कडसा, ता. दिग्रस), दीपक सुरेश शेवाळे (रा. गणेशपूर, ता. मालेगाव), अक्षय प्रभू चव्हाण (रा. साखरा, ता. दिग्रस) यांचा मृत्यू झाला. पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.