वर्धा : लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर सर्वच पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे. सर्वप्रथम संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने अशा इच्छुकांची नावे मागविणे सुरू केले आहे. त्यात आता प्रदेश पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून निवेदन दिले. त्यात वर्धा लोकसभा मतदारसंघातून पक्षनेत्या प्रियंका गांधी यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. त्यांची उमेदवारी आल्यास त्याचा फायदा मध्य भारतातील काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना सहज होवू शकतो, असा तर्क ठेवला.

हेही वाचा – नागपूर : मेडिकलमध्ये अमृत महोत्सवादरम्यान मुलींची ‘रॅगिंग’ ! आरोग्य विद्यापीठाकडे तक्रार

हेही वाचा – ‘मोबाईल चेक पॉईंट’च्या नावावर आठ तपासणी नाक्यांची भर? परिवहन खात्याचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, सचिव खान नायडू तसेच मजीद कुरेशी, प्रकाश मक्रमपूरे, इक्राम हुसेन, संजय कडू, जलज शर्मा आदी नेते हे भेटून आले. या सोबतच अल्पसंख्य वर्गाची मते मिळावी म्हणून प्रयत्न करावे, आदिवासी समाजाकडे लक्ष द्यावे, उदयपूर शिबिरात झालेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, अशा व अन्य मागण्या करण्यात आल्या. ठरावांची अंमलबजावणी होत नसेल तर त्यास पुढे कोणीही गांभीर्याने घेणार नाही. झाल्यास अन्याय झालेल्या नेत्यांमध्ये उत्साह संचारेल, असा दावा या नेत्यांनी केला आहे. हे निवेदन पक्ष सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.