नागपूर : एकीकडे एसटी महामंडळात बढती होत नसल्याची ओरड कर्मचारी करतात तर दुसरीकडे बढती मिळालेले १६ जण अद्यापही निश्चित ठिकाणी रूजू झाले नाहीत. हे कर्मचारी १२ जूनपूर्वी निश्चित ठिकाणी रूजू न झाल्यास त्यांची बढती रद्द होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलिनिकरणाच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी संप केला होता. त्यावेळी बढती प्रक्रियेबाबतही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता वरिष्ठ लिपिकांची लेखाकार पदावर, तर सहाय्यक भांडारपालांची भांडारपालपदी बढती करण्यात आली. बहुतांश कर्मचाऱ्यांना विभागाबाहेर पदस्थापना दिली गेली. परंतु, या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १६ कर्मचारी अद्यापही बढतीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांकडून बढती नाकारण्याबाबतही काही कळवण्यात आलेले नाही. दरम्यान, महामंडळाने १२ जून २०२३ पर्यंत बढतीच्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास त्यांचा बढतीस नकार समजून त्यांची बढती रद्द करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक आणि संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. या विषयावर एसटीचे महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.) अजित गायकवाड म्हणाले, संबंधित कर्मचारी बढतीच्या ठिकाणी रूजू न झाल्यास त्यांची नियमानुसार बढती रद्द होणार आहे.

हेही वाचा – अकोलेकर भूमिपुत्राची संघर्षगाथा अमेरिकेत झळकणार; ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नामांकन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक सात कर्मचारी विदर्भातील

लेखाकार आणि भांडारपाल पदावर बढतीनंतरही रूजू न होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नागपुरातील ३, भंडारा १, यवतमाळ २, चंद्रपूर १, बीड २, सिंधुदुर्ग १, सोलापूर १, मुंबई २, पुणे १, लातूर १ तर परभणीतील एकाचा समावेश आहे.