बुलढाणा: रखडलेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आज ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी वकाना (ता संग्रामपूर) येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढल्याने प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली.

हेही वाचा – भंडारा : आमदार भोंडेकर-परिणय फुकेंमध्ये धुसफूस! आजी आमदाराने माजी आमदाराचे नाव घेणे टाळले

हेही वाचा – नक्षलवादी ते तेलंगणा सरकारमध्ये मंत्री; असा आहे सीताक्काचा संघर्षमय प्रवास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील तीनेक वर्षांपासून रखडलेल्या चांगेफळ ते रूधाना, वकाना, खामगाव रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, जिल्हा निरीक्षक विजय वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली गावकरी आंदोलनात सहभागी झाले. तालुक्यातील चांगेफळ ते रूधाना वकाना खामगाव रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अपघातांची मालिका सुरू असून शेकडो वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहन धारकासह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.