scorecardresearch

Premium

पायाभूत सुविधा निर्माण कार्याचा रेल्वे गाड्यांना फटका; ‘या’ रेल्वे गाड्या रद्द व ‘यांच्या’ मार्गात बदल

दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या कागजनगर आणि बल्लारशाह रेल्वेस्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या सुरुवातीस ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कामाच्या संदर्भात पायाभूत सुविधांचे कार्य केले जाणार आहे.

train
पायाभूत सुविधा निर्माण कार्याचा रेल्वे गाड्यांना फटका; 'या' रेल्वे गाड्या रद्द व 'यांच्या' मार्गात बदल

अकोला: दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या कागजनगर आणि बल्लारशाह रेल्वेस्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या सुरुवातीस ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कामाच्या संदर्भात पायाभूत सुविधांचे कार्य केले जाणार आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.कागजनगर-बल्लारशाहदरम्यान ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ चे कार्य १४ सप्टेंबरपर्यंत, ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ काम १० ते २२ सप्टेंबरपर्यंत तर ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कार्य २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम होईल.

२२१५१ पुणे-काझिपेट एक्सप्रेस २२ सप्टेंबर रोजी, तर २२१५ काझिपेट-पुणे एक्सप्रेस २४ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. २०८०३ विशाखापट्टनम -गांधीधाम एक्सप्रेस १४, २१ सप्टेंबर रोजी व २०८०४ गांधीधाम – विशाखापट्टनम एक्सप्रेस २४ सप्टेंबरला नागपूर मार्गे वळविण्यात आली आहे. २४ रोजी २०८१९ पुरी-ओखा एक्सप्रेसला चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे थांबा राहणार नाही. १२६५५ अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेस २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान व १२६५६ चेन्नई -अहमदाबाद एक्सप्रेस २१ ते २६ दरम्यान अकोला मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीला बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे थांबा राहणार नाही. रेल्वे गाड्या रद्द व इतर मार्गाने वळविण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
Overcrowding on footbridges at Thane station
ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर
10 fast local trains on Central Railway from Dadar station towards Kalyan as per new schedule
मध्य रेल्वेवर दहा जलद लोकल, नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने फेऱ्या
aarey car shed
मेट्रो ६ मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी दोन निविदा सादर, लवकरच निविदा अंतिम करणार

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway trains affected by infrastructure construction akola ppd 88 amy

First published on: 12-09-2023 at 14:38 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×