पुणे-नागपूर मार्गावर वर्षभरच रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट मिळणे अवघड आहे. उन्हाळ्यात तर त्यात आणखी गर्दीत भर पडते. हे लक्षात घेऊन रेल्वेने अजनी-पुणे-अजनी दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न, गर्भपातासाठी दवाखान्यात गेल्यावर..

ही विशेष रेल्वेगाडी ५ एप्रिल ते १६ जुलै दरम्यान धावणार आहे. पुणे-अजनी (०११८९) पुणे येथून दर बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५० वाजता पोहोचेल. अजनी-पुणे (०११९०) विशेष गाडी अजनी येथून दर गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ वाजता पोहोचेल. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, आठ सर्वसाधारण डबे राहतील.

इतवारी-रिवा एक्स्प्रेस उद्यापासून भंडारा येथे थांबणार

इतवारी-रिवा आणि रिवा-इतवारी एक्सप्रेसला आता भंडारा येथे देखील थांबणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना रेल्वेने काढली आहे. गोंदियामार्गे धावणारी ही गाडी भंडारा येथे देखील थांबावी, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांची होती. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील मागणी लावून धरली. स्थानिक खासदाराने रेल्वे अधिकाऱ्याची भेट घेतली होती. अखेर ही मागणी मान्य झाली असून १ एप्रिल २०२३ पासून या गाडीला भंडारा रोड येथे थांबा देण्यात आला आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस धावणारी ही गाडी रिवा ते इतवारी जाताना भंडारा रोड येथे सकाळी ६.१५ वाजता तर इतवारीकडून रिवाकडे जाताना रात्री ७.४५ वाजता थांबणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways start special train from ajni to pune during summer vacation rbt 74 zws
First published on: 31-03-2023 at 09:41 IST