तृतीयपंथींना प्रेम करण्याचा अधिकार असून लग्न करून एकत्र राहता येते. तृतीयपंथींयाना समाजात सन्मानाची व समान वागणूक मिळावी यासाठी संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात भव्य रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तृतीयपंथीयांनी हातात ‘मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा’ , ‘प्रेम हे प्रेम असतं’ असे फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा >>>गोंदिया जिल्ह्यातील १.५१ लाख शेतकर्‍यांनाच मिळणार बोनस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृतीयपंथीयांनासुध्दा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनासुध्दा प्रेम करण्याचा, विवाह करण्याचा अधिकार आहे. हैदराबादमध्ये एक तृतीयपंथी जोडपे बाळास जन्म देणार आहे. त्यामुळे समाजाचा तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आज २५ फेब्रुवारीला शहरातील मुख्य मार्गाने थिरकत भर उन्हात भव्य रॅली काढण्यात आली. तृतीयपंथींच्या फलकांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्षे वेधून घेतले. समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून येणाऱ्या काळात त्यांना नागरिकांकडून सन्मानाची वागणूक मिळेल असा विश्वास आशा राज काचोळे यांनी व्यक्त केला.