चंद्रपूर: चंद्रपूर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षा दरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशात्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहे .महाराष्ट्रात अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत.
डायनोसोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात मिळाली आहेत. जीवाश्मा सोबतच पाषाणयुगीन अवजारे सुद्धा मिळाली आहेत.
ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि जवळ जवळ २५००० वर्षादरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa) आहेत. .हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलोजी चे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा यांनी व्यक्त केले आहे.
हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी लुप्त झाले.आजचे आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. ह्याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळल्याने ह्या हत्तीं जीवाश्मांचे चे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.
प्रा सुरेश चोपणे हे २०१९ ते २०२४ पर्यंत प्लेईस्टोन काळातील गाळात जीवाश्मे शोधत होते.त्यांना २०२०-२१ मध्ये प्रथमता चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली .संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच २०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली .त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले.
मिळालेली जीवाश्मे
सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे , दात आणि डोक्याची कवटी ,छातीची हाडे अश्या अवयवांचा समावेश आहे.अजून हत्तीची दोन लांब सुळे दात मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. .गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाली आहेत.
परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत . सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग,पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगणा मध्ये आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे.