नागपूर : वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरु केली. एका दिवसातच विरूद्ध दिशेने वाहन चालविणे (राँग साईड), सिग्नल मोडणाऱ्या (जम्पींग) करणाऱ्या ६७२ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. गेल्या तीन वर्षांतील ही विक्रमी चालान कारवाई आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था बिघडत चालली आहे. दिवसेंदिवस अपघात आणि अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाहन चालकांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन होत असून नियम पाळणाऱ्या चालकांना याचा मनस्ताप होतो. दरम्यान, बुधवारी वाहतूक विभागाकडून नियमांचा भंग करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. यात विशेषत: विरूद्ध दिशेने वाहन चालविणे, सिग्नल मोडणाऱ्यांसाठी मोहीम राबविण्यात आली. यात पोलिसांनी ६७२ वाहन चालकांवर चालान कारवाई केली. यात ३८४ विरूद्ध दिशेने वाहन चालविणारे तर २८८ वाहतूक सिग्नल मोडणाऱ्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, यापुढे देखील पोलिसांची ही कारवाई अशीच सुरू असणार आहे. त्यामुळे, नियमांचे पालन न करणाऱ्यांना चालान कारवाईला सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे. वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी आणि पोलिसांचा वचक बसावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांनी दिली.

…तर तक्रार करा

वाहतूकीच्या नियमांचे कोणी उल्लंघन करीत असेल. अशांची ‘ट्राफीक मित्र’ या व्हॉट्सअ‍ॅप (८९७६८९७६९८) क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. तक्रार करताना घटनास्थळाचे फोटो (लोकेशन), वेळ व ठिकाण नमूद करावे. त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळनिहाय कारवाई

परिमंडळ    राँगसाईड – सिग्नल जंप

एमआयडीसी   ४६ – ००

सोनेगाव   ४७ – ३४

सदर    ४२ – ०३

सीताबर्डी २२ – ७९

कॉटन मार्केट ५७ – ११

लकडगंज  ३६ – ३३

अजनी  २९ – २१

सक्करदरा  ३४ – २९

इंदोरा  २७- ७२

कामठी  ४४- ०६

एकूण ३८४ – २८८