पोलीस भरती प्रक्रीयेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वर्षातील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. या अटीतील तारखेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच प्रमाणपत्र सादर करणे हे उमेदवारांना अशक्य आहे. यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तारखेची अट शिथिल करावी अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

हेही वाचा- नागपूर : ‘समृध्दी महामार्गाचे उद्घाटन जानेवारीत’; फडणवीस यांचे सूतोवाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांचा विचार करता आपल्या मार्गदर्शनाखाली गृह विभागामार्फत मेगा पोलीस भरती होत आहे. मात्र, ती करताना काही अटी जाचक ठरत आहे. तरी बहुजन विद्यार्थ्याचा विचार करावा, अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.