नागपूर : घर खरेदीच्या उच्च-मूल्याच्या व्यवहारांमुळे राज्यात मालमत्ता नोंदणी महसूल डिसेंबरमध्ये गेल्या नऊ महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजे एकूण ३ हजार ८७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, तरीही उद्दिष्टपूर्तीपासून हा विभाग दूर आहे.

राज्य मालमत्ता नोंदणी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये राज्यभरात २ लाखांहून अधिक मालमत्तांची नोंदणी झाली असून, त्यातून ३ हजार ८७० कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे, तो एप्रिल २०२२ पासूनचा सर्वाधिक होता.

उच्च महसूल संकलनानंतरही विभागाला राज्य सरकारने ठरवून दिलेल्या महसुली उद्दिष्टाच्या ९१ टक्के उद्दिष्ट साध्य करता आले, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नऊ महिन्यांपैकी सात महिन्यांचे महसूल संकलन तीन हजार कोटींपेक्षा जास्त आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, महानगरांमध्ये वाढत्या मुद्रांक शुल्कामुळे अधिक महसूल मिळण्यास मदत झाली. या वर्षी विभागाचे वार्षिक महसूल लक्ष्य ३२००० कोटी रुपये आहे आणि ३० डिसेंबपर्यंत विभागाने २९२२१ कोटी रुपये जमा केले (९१ टक्के) आहेत. कमी व्याजदर आणि परवडणाऱ्या किमतीमुळे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असून यामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी आहे.

महिना         दस्त नोंदणी     महसूल

             (कोटी रुपयांत)

एप्रिल        २,११,९१२      १,८०२.९४

मे             २,२२,५७६     २,८०७.७७

जून          २,४१,२८६      ३,४२३. ८९

जुलै           २,०५७०९       ३,५६६.५२

ऑगस्ट        १,९७,५७७             ३,२९३.१७

सप्टेंबर        २,०६६६२              ३,४२९.८१

ऑक्टोबर       १,७७,५०६             ३,४८४.७२

नोव्हेंबर        २,१०,१७२             ३,५४२.४४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबर        २,०२,१७५              ३,८७०.६१