Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years : संघाच्या स्थापनेनंतर स्वयंसेवक घडवण्यासाठी नागपूरमध्ये उन्हाळी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला. या वर्गाचे संघाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण स्थान आहे. स्वयंसेवक हा संघाचा कणा आहे. संघ कार्याचा प्रसार आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात, हे जाणूनच डॉ. हेडगेवार यांनी १९२७ मध्ये संघ स्वयंसेवकांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांची संकल्पना मांडली. डॉ. हेडगेवार यांच्या काळात पहिला वर्ग १९३९ ला झाला. १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर आणि १९७५ मध्ये संघ बंदीच्या काळात हे वर्ग झाले नाहीत. हा अपवाद सोडला तर प्रशिक्षण वर्गाची परंपरा आजही अव्याहत सुरू आहे.

दरवर्षी हे वर्ग नागपुरात होतात व त्यात देशभरातील निवडक स्वयंसेवक सहभागी होतात. रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात आयोजित केला जाणारा तृतीय संघ शिक्षा वर्ग म्हणून त्याला ओळखले जाते. या वर्गाचे नाव आता ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’ असे करण्यात आले आहे. या वर्गात स्वयंसेवकांना शिस्त, संघ कार्य, संघ विस्तार, याबाबत प्रशिक्षण दिले जाते. पूर्वी वर्गाचा कालावधी ३० दिवस होता तो आता २५ दिवसांवर आणण्यात आला. संघ प्रशिक्षण वर्गासाठी स्वयंसेवकाची निवड करताना काही निकष ठरवण्यात आले आहेत. त्याची पूर्तता करणाऱ्यांनाच या वर्गात सहभागी होता येते. स्मृती मंदिर हे स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान असल्याने तेथे हे वर्ग घेतले जातात.

हेही वाचा – ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सरकारी बांधकामे ठप्प, ही आहेत कारणे

संघाचे कार्य जसजसे वाढत गेले आणि इतर भागात पसरले तसे वैचारिक दृष्ट्या बौद्धिक सुरु झाले. वेगवेगळ्या विषयावर विचार मंथन सुरू झाले. संघ शिक्षा वर्ग तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये विभागला गेला. पहिल्या दोन वर्षांचे प्रशिक्षण संबंधित प्रांतात दिले जाते आणि तिसऱ्या वर्षाचे प्रशिक्षण फक्त नागपुरात दिले जाते.

हेही वाचा – अमरावती : शिवशाही बसला आग; जीवितहानी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात नागपूरचे स्वतःचे स्थान आणि महत्त्व आहे. प्रारंभी प्रमुख संघ कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रांतात जाऊन आपापल्या कार्यक्षेत्रात संघाचा विचार पक्का केला. त्यानंतर रेशीमबाग स्मृती भवन परिसरात कार्यकर्ता विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले. वर्गाला स्वयंसेवक देशाच्या विविध प्रांतांतून येतात आणि अशा प्रकारे सर्व अंतर्भूत विविधतेसह आणि एकतेच्या मूलभूत तत्त्वासह एक लघु भारत सादर करतात. गेल्या काही वर्षात संघ शिक्षा वर्गाला देशभरातून स्वयंसेवक येत असताना समारोपाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मागदर्शन करतात याकडे लक्ष असते. या वर्गाला संघ संबंधित भारतीय जनता पक्षासह विविध संघटनाचे अखिल भारतीय पदाधिकारी भेट देत असतात.