नागपूर : शेतीच्या हिश्शे वाटणीवरून कुटुंबात होणारे वाद, त्याला लागणारे हिंसक वळण, न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे यावर तोडगा म्हणून परस्पर सामंजस्याने ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल खात्याने सूरू केलेली ‘सलोखा’ योजना गावपातळीवर सकारात्मक परिणाम घडवून आणताना दिसते.

गावपातळीवर शेतीमधील वहिवाटीसंदर्भात कुटुंबात पिढ्यानपिढ्या वाद सुरू आहे. महसूल विभागाकडे असंख्य तक्रारी दाखल असून सद्यपरिस्थिती बदलण्यासाठी, शेतकरी बांधव वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होते.अनेकदा कौटुंबिक वादाला हिंसक वळणही लागते. हा वाद सामंजस्याने मिटावा, गावपातळीवर कुटुंबात सलोखा निर्माण व्हावा म्हणून महसूल विभागाने सलोखा योजना आणली. शेतजमिनीचा ताबा एका शेतकऱ्याकडे व अभिलेख दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावे असलेल्या प्रकरणी सहमतीने अदलाबदल करुन अभिलेख दुरुस्त केले जातात.

हेही वाचा – तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर ‘या’ कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही

हेही वाचा – आला धोंड्याचा महिना! लेकी येणार माहेराला, जावाईबापू सोन्याने मढनार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेंतर्गत राज्यभरात पाच महिन्यांत १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूल खात्याने दिला. सर्वात जास्त ७६ एवढी दस्त नोंदणी अमरावती विभागात झाली असून यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. तर पुणे आणि ठाणे विभागात प्रत्येकी १७ एवढ्या दस्त नोंद झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात १२, नाशिक विभागात १०, औरंगाबाद विभागात ९, लातूर विभागात ८ एवढ्या दस्त नोंद झालेली आहे. राज्यात एकूण १४९ दस्त नोंद झाली असून योजनेतील सवलतीनुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क असे अनुक्रमे १ लाख ४९ हजार २०० एवढे प्राप्त झाले. या योजनेअंतर्गत नोंद होणाऱ्या अदलाबदल दस्तावर मुद्रांक शुल्कासाठी १ हजार रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार रुपये अशी नाममात्र रक्कम ठेवण्यात आली आहे