scorecardresearch

नागपूर: समृद्धीची पाहणी, मेट्रोची सफर, ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा आणि अन्य काही…. कुठे कुठे जाणार पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर- बिलासपूर या सेमी अतिजलद वंदेभारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

नागपूर: समृद्धीची पाहणी, मेट्रोची सफर, ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा आणि अन्य काही…. कुठे कुठे जाणार पंतप्रधान?
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा जसजसा जवळ येत आहे तसतशी या दौ-याबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधानांचे सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर ते नागपूर रेल्वे स्थानकावर जाण्याची शक्यता असून तेथे त्यांच्या हस्ते नागपूर- बिलासपूर या सेमी अतिजलद वंदेभारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

तसेच रेल्वे स्थानक विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते झिरोमाईल्स येथील मेट्रो स्थानकाला भेट देतील. तेथील फ्रीडम पार्कच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होईल. तसेच मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. तेथूनच पंतप्रधान मेट्रो व्दारे खापरीपर्यंत किंवा एअरपोर्ट स्थानकापर्यंत प्रवास करतील. तेथून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना होतील.

हेही वाचा: पंतप्रधानांच्या हस्ते फक्त समृद्धीचं नव्हे तर……

महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान समृध्दीचे उद्घाटन करतील. महामार्गाची पाहणी करतील. तेथून मिहानमधील एम्सजवळील प्रांगणात आयोजित मुख्य कार्यक्रम स्थळी येतील, तेथै त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
अद्याप पंतप्रधानांच्या दौ-याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून देण्यात आला नाही. मात्र प्राथमिक स्वरूपात दौ-याची आखणी वरील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. ऐनवेळी त्यात बदलही केला जाऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 11:53 IST

संबंधित बातम्या