नागपूर : बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दरात वाळू विक्री करणाऱ्या माफियांना प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या नव्या प्रणालीमुळे आता ग्राहकांना घरबसल्या वाळूसाठी नोंदणी करता येणार आहे.

नवीन वाळू धोरणानुसार जनतेला स्वस्त दरात आणि घरपोच वाळू पुरवठा करण्यासाठी महाखनिज या संकेतस्थळावर नोंदणी सुरू केली आहे. स्वत:च्या मोबाईलवर तसेच शासनाच्या आपले सरकार सुविधा केंद्रावरही नोंदणी करता येणार आहे. सोबतच वाहतूकदारही निवडता येईल. अत्यंत माफक दरात वाळू उपलब्ध झाल्यामुळे अवैध वाळू उत्खननाला आळा बसण्यास मदत होईल. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘एल निनो’ यंदाही वातावरणाचे गणित बिघडवणार? वाचा काय म्हणते अमेरिकेची संस्था….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रति ब्रास इतका असेल दर

जिल्ह्यातील वाळूचा दर हा प्रती ब्रास ६०० रुपये आहे. या व्यतिरिक्त जिल्हा खनिज प्रतिष्ठान कर ६० रुपये, एसआय शुल्क १६.५२ रुपये असे एकूण ६७६.५२ रुपये एक ब्रास वाळूसाठी शुल्क असणार आहे. एका ग्राहकाला एका वेळी ११ ब्रास वाळूसाठीच नोंदणी करता येईल.