लोकसत्ता टीम

नागपूर : माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार्टशिटमध्ये निलेश पराडकर यांच्या चेंबूर येथिल कार्यालयात हे षडयंत्र रचले गेले होते. या हल्ल्यामागे संजय राऊत आणि त्यांच्या बंधू हात असून त्यांच्या सांगण्यानुसार हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

मनसेचे नंते संदीप देशपांडे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता ते बोलत होते. ज्या निलेश पराडकर याने हल्ला केला आहे. त्याचे बॅनरवर संजय राऊत आणि त्यांच्या बंधूचा फोटो आहे. त्यामुळे माझ्या हल्ल्यामागे त्यांचा हात आहे. हल्ला प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यामुळे खरे सत्य समोर येणार आहे. या प्रकरणी निलेश पराडकर सध्या फरार आहे असला तरी राऊत बंधूना तो माहिती आहे. राऊत बंधू बरोबर हा अनेकदा दिसला आहे.त्याला अटक झाल्यानंतर त्यांचे कनेक्शन समोर येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

आणखी वाचा-अकोला दंगल प्रकरणातील मुस्लीम आरोपींना आंतरधर्मीय जामीनदार आणण्याची सूचना; पोलीस अधीक्षकांनी आरोप फेटाळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तयारी सुरू करण्यात आली असून त्याचाच एक भाग नागपूर जिल्ह्यात शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार आहे. बीआरस महाराष्ट्रात प्रवेश करत आहे मात्र पदाधिकाऱ्यांना इनोवा गाडी देऊन पक्ष वाढत नाही अशी टीका त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कधी होईल हे ब्रह्मदेव सांगेल. विदर्भातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन लवकरच राज ठाकरे यांना अहवाल सादर केला जाईल. नागपुरात पाण्याच्या समस्येवर पक्षाने आंदोलन केले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूला अभय कुणाचे आहे याची माहिती समोर येईल असेही देशपांडे म्हणाले.