नागपूर : समाजात विविध मार्गाने सेवा करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. सेवेने आत्मीयता वाढत असते आणि ती आत्मीयतेमुळेच होऊ शकते. त्यामुळे सेवा ही फॅशनसाठी किंवा गुणवत्ता मिळविण्यासाठी करू नये असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्यावतीने वार्षिक पुरस्कार वितरण व सत्कार समारोहाच्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. राजवाडा पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमाला आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे सचिव व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, तेलंगणा येथील उद्योजक व समाजसेवक कोठा जयपाल रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. वा.द. भाके आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूर : भगव्या ध्वजाशिवाय संघाचा कोणीही आदर्श नाही, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मनुष्याला बुद्धी असल्याने तो स्वतःला चांगले दाखवू शकतो मात्र,पशु जसा आहे तसाच भासवतो. शिवाय, माणसापेक्षा जास्तच चांगला वागतो. आपण कसेही असलो तरी समाजासाठी आपण किती उपयोगी आहे त्यांचा एक निश्चित क्रम आहे. पशुंचे अनुशासन निश्चित आहे. मात्र, मनुष्याला विचार आहे. दुसऱ्याच्या कामी येऊ शकेल असे त्याने जगायला हवे आणि काम करायला हवे.

हेही वाचा >>> अकोला : पांढऱ्या सोन्याच्या भावात चढउतार, उत्पादकांची विक्रीसाठी अकोटकडे धाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज वर्तमानपत्रात फोटो छापून येणाऱ्यांना बोलावले नाही तरी चालेल. मात्र, समाजात तळाशी राहून काम करणाऱ्यांना आपण जोडले पाहिजे. फॅशन म्हणून सेवा करु नये असा सल्ला त्यांनी दिला. समाजात तुमची व्यक्ती दुखी असेल तर तुम्ही त्याची सेवा करावी. आपल्या माणसांमध्ये उच्च-नीच नसते, अशी अभिव्यक्ती माणसात आढळते त्यामुळे माणुसकी समजून समाजात काम करावे असे डॉ. भागवत म्हणाले.