वर्धा : एक मे रोजी निकाल लागणार व नंतर शाळांना सुट्टी लागणार म्हणून बालगोपाल मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत लागले असतात. पण आता त्यांचा थोडा भ्रमनिरास होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यात बदल केला आहे.

शैक्षणिक सत्र व अन्यबाबत पूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा करायचा आहेच. पण सहा मे रोजी कार्यक्रम घ्यायचा आहे. छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ या दिवशी घ्यायचा आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना आहे. या नंतर निकाल जाहीर करावा व गुणपत्रकांचे वाटप करावे, असे सांगण्यात आले आहे. पुढे सुट्टी सुरू होईल. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या शालेय कालावधी नेहमीप्रमाणेच राहणार आहे.

हेही वाचा – पूर्व विदर्भात ३५ ‘आपला दवाखाना’ सुरू होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र दिन व स्मृती सोहळा या पार्श्वभूमीवर हा बदल वेळेवर करण्यात आला आहे. म्हणून मुलांनो थोडी कळ सोसा व मगच सुट्टीची तयारी करा, असा शिक्षक वर्गाचा सूर आहे.