वर्धा : सत्ताधारी पक्षातील घडामोडी पाहून आमदार बच्चू कडू यांनी अस्वस्थता व्यक्त केली. तोच धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी टोले हाणले. येथे शरद पवार समर्थक मंडळींचा संवाद मेळावा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.या ठिकाणी अनिल देशमुख म्हणाले, की आता तर सुरवात झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठ्या प्रमाणात आमदार अस्वस्थ आहेत. गोंधळाची स्थिती आहे. सत्ताधारी आमदार सांभाळण्यात व्यस्त आहेत. चार ते पाच दिवसांनी विधिमंडळ अधिवेशन आहे.

लवकर खातेवाटप करून मंत्र्यांना अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे. राज्यात सर्वात अधिक भाजपचे आमदार चिंतेत आहेत. त्यांच्या १०५ पैकी चार, पाच मंत्री झाले. बाहेरचे मंत्री बनत आहे. भाजप आमदार खासगीत म्हणतात की, आमच्या पक्षात काय चाललं समजत नाही. आम्ही होतो तसेच आहोत तर बाहेरचे पहिल्या पंक्तीत बसत आहे. शिंदेंसोबत गेलेल्या चाळीस आमदारांपैकी अनेकांनी मंत्रिपदाची आशा सोडली. नव्यात त्यांच्यापैकी एकही नाही. अस्वस्थ होत ते देखील बोलू लागले आहेत, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.