लोकसत्ता, प्रशांत देशमुख

वर्धा : राज्यात २०२३-२४ या कालावधीत निवडणूक विषयाच्या अनुषंगाने उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरीची नोंद राज्य शासनाने घेतली आहे. यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागनिहाय निवड राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार व सत्कारासाठी करण्यात आली आहे. नागपूर विभागातून वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून याच विभागातून त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले यांची निवड झाली आहे. अमरावती विभागातून अकोलाचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, पुणे विभागातून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नाशिक विभागात नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री, छत्रपती संभाजीनगर विभागात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे,तर कोकण विभागात सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची निवड करण्यात आली आहे.

आणखी वाचा-दिल्लीकडून विदर्भाचा दारूण पराभव, महिला क्रिकेट संघ केवळ २८ धावात गारद

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून अमरावती विभागात अकोला येथील अनिता भालेराव, पुणे विभागात सातारा येथील अतुल नेत्रे, कोकण विभागात ठाणे येथील अमित सानप, नाशिक विभागात नाशिकचे विशाल नरवडे,छत्रपती संभाजीनगर विभागात लातूरचे सुशांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय प्रियंका कर्डीले – देवळी, अतुल नेत्रे – कराड दक्षिण, अमित सानप – भिवंडी पूर्व, विशाल नरवडे – कळवण, अमिता भालेराव – अकोला पश्चिम, सुशांत शिंदे – उदगीर यांनी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून या विधानसभा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यादीत जिल्हाधिकारी कर्डीले यांच्या सोबतच धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांचे नाव आहे. ते जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच रुजू होण्यापूर्वी वर्धा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. या दोन अधिकाऱ्यांची निवड झाली म्हणून महसूल प्रशासनात विशेष आनंद व्यक्त होत आहे. तसेच कर्डीले दम्पती एकाच वेळी पुरस्कार प्राप्त ठरल्याचा आनंद व्यक्त होत आहे.