नागपूर : राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी विभागात २९ हजार ४२ तर नागपुरात सात हजारांहून अधिक प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरात ओबीसींची संख्या बहुसंख्य आहे.

येत्या २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू होणार असून ३१ जानेवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहे. नागपूर विभागातील ६४ तालुक्यांतील ८ हजार ४२९ गावांतील १ कोटी १७ लाख ५३ हजार ५२ लोकसंख्या, तसेच २६ लाख ९३ हजार ४२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी २९०४२ प्रगणकांच्या सेवा घेण्यात येणार आहे. त्यासोबतच २२३ राखीव प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार ९७० पर्यवेक्षक तसेच १८८ राखीव पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले आहे. १५० प्रगणकाची नियुक्ती करताना १५० ते २०० कुटुंबासाठी एक प्रगणक आणि १५ प्रगणकांसाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. प्रगणक व परीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

upi transactions decline
एप्रिलमध्ये ‘यूपीआय’ व्यवहारांत किरकोळ घट
Goldman Sachs forecasts
भारत वैश्विक ‘सेवा आगार’ बनेल ! निर्यात २०३० पर्यंत ८०० अब्ज डॉलरवर जाण्याचा गोल्डमन सॅक्सचा आशावाद
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट

हेही वाचा – अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाचे निमित्त, नागपुरात मेट्रो भाड्यात ३० टक्के सवलत

हेही वाचा – “वंचितला सोबत न घेतल्यास काँग्रेस नेते तुरुंगात जातील,” अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सूचक इशारा; म्हणाले, ‘तुमची सत्ता…”

नागपूर महानगरपालिका हद्दीत ५ लाख २७ हजार ६३४ घरे आहेत. २४ लाख ५ हजार ६५६ लोकसंख्येसाठी ७०५५ प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील चार लाख ४२ हजार ८९७ घरातील २२ लाख १४ हजार ४८५ लोकसंख्या असून त्यासाठी ६७८ प्रगणक राहणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील तीन लाख ९८४६ घरातील १३ लाख ६७४ हजार लोकसंख्या, भंडारा जिल्ह्यातील दोन लाख ७८ हजार ७६ घरातील बारा लाख ३३४ लोकसंख्या, गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख ९२ हजार ३५९ घरातील १३ लाखा २२ हजार ५०७ लोकसंख्या, चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ६९ हजार,८६९ घरातील तीन लाख ५२ हजार ४१७ लोकसंख्या, चंद्रपूर जिल्ह्यातील चार लाख ७० हजार ९८२ घरातील १८ लाख ८३ हजार ९२८ लोकसंख्या, तर गडचिरोली जिल्ह्यातील तीन लाख ७६० घरातील दहा लाख ७२ हजार ९४२ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.