भंडारा: जिल्ह्यातील पवनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील “शाडो” वाघीण कायमच पर्यटकांना भुरळ घालत असून सध्या दररोज पर्यटकांना दर्शन देत आहे. शाडो वाघीण तिच्या तीन बछड्यांसह पर्यटकांना अनेकदा दिसते. ही वाघीण आणि तिची बछडे ‘टीओ ६ परी’ म्हणून ओळखली जातात, आणि त्यांचे छायाचित्र अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होते. दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना या शाडो वाघिणीचे तिच्या तीन बछड्यांसह दर्शन झाले. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावरून या वाघिणीचा बछड्यांसह मुक्त संचार बघून पोलिसांनाही त्यांचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
पवनीजवळील उमरेड करांडला जंगलात टी २० शाडो वाघिणीचा तिच्या तीन बछड्यांसह डेरा आहे. या अभयारण्यात पर्यटकांना ही वाघीण आपल्या पिल्लांसह कायम पर्यटकांना दर्शन देत असते. त्यामुळं पर्यटक जाम खूश आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पवनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील "शाडो" वाघीण कायमच पर्यटकांना भुरळ घालत असून सध्या दररोज पर्यटकांना दर्शन देत आहे. https://t.co/ZfyIjgJO7V#Maharashtra #Bhandara pic.twitter.com/VxNmEeZTZM
— LoksattaLive (@LoksattaLive) October 27, 2025
या शाडो वाघिणीचा बछड्यांसह मॉर्निंग वॉक, बछड्यांची तिच्यासोबत मस्ती आणि वाघिणीला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक उमरेड करंडला अभयारण्यात सफारीसाठी गर्दी करीत असतात. जय वाघ आणि f2 वाघिणी प्रमाणे शाडो वाघिणीने देखील पर्यटकांना चांगलेच आकर्षित केले आहे.
दरम्यान, काल मध्यरात्री पवनी ते खापरी मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना उमरेड- पवनी वन्यजीव अभयारण्यातील पवनी गेट येथे टी 20 शाडो वाघीण आणि तिच्या बछड्याचा मुक्त संचार सुरू होता. त्याच मार्गाने गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला शाडो वाघीण आणि तिच्या बछड्यांसह नाईट वॉक करताना दिसून आली. वाघिणीसह तीन बछडे बघून पोलिसांमध्येही उत्साह संचारला त्यांनी या शाडो वाघिणीचा नाईट वॉक कॅमेरात कैद केला. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून शाडो वाघिणीला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.
