लोकसत्ता टीम

नागपूर : पंतप्रधान होण्याचे स्वप्न असताना जनतेने मदत न केल्याने ते स्वप्न तडीपार झाले. पंतप्रधान दूरच पण गृहमंत्री सुद्धा होऊ शकले नाही. केवळ सात जागांच्या भरोशावर कन्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत नेते होण्याचे स्वप्न पाहतात अशा शब्दात वनमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. राज्य सरकार थेट चर्चा करायला तयार आहे मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही जरांगे पाटील आणि ओबीसीच्या नेत्यांशी वारंवार चर्चा करतो आहे. मराठा समाजाला आम्ही १० टक्के आरक्षण दिले आहे. महाविकास आघाडीकडून आरक्षणाबाबत कुटलाच सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि आता तर ओबीसीबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही. त्यांना दोन्ही समाजमध्येा वाद निर्माण करायचे आहे. मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यायचे की स्वतंत्र राहायचे यावर त्यांनी पहिले आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. भूमिका लपवून ठेवायला पोखरनची चाचणी आहे का? असा सवाल विरोधकांच्या भूमिकेवर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी शोधणारी यंत्रणाच नाही! पेट्रोल पंप चालकांची संघटना म्हणते…

आम्ही ओबीसी आणि मराठा समाजासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन चर्चा करायला तयार आहे मात्र विरोधी पक्षातील नेते बहिष्कार टाकून बैठकीला येत नाही. त्यामुळे शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असेही मुनगंटीवार म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी नायक म्हटले तर त्यांना उद्धव ठाकरे दैनिक सामना मधून काढतील. त्यामुळे त्यांच्या शब्दाबद्दल गंभीर होऊ नका. संजय राऊत हे शरद पवारांचे नाही उद्धव ठाकरेंचे आहे हे सिद्ध करण्यासाठी ते अनेकदा बोलतात. संजय राऊत शरद पवारांचे भक्त असले तरी उद्धव ठाकरेना त्यांना जास्त महत्त्व देत आपली भूमिका मांडावी लागत आहे अन्यथा त्यांना मातोश्री बाहेर जावे लागेल अशी टीका मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

निवडणुक उमेदवाराच्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्षमतेच्या आधारावर व्हावी, जातीच्या आधारावर नाही. सार्वजनिक विभाग हा जातीच्या आधारावर जगत नाही. जातीची शिडी वापरून सत्ता मिळविण्यासाठी विरोधी पक्ष पाहत आहे. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा असल्याचे मुगंटीवार म्हणाले.

आणखी वाचा-शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘हे’ अॅप कामकाजात वापरणे अनिवार्य; सुरक्षा प्रथम म्हणून हा उपाय…

लोकसभेत निश्चितपणे आम्ही बेसावध राहिलो. जोसेफ ग्लोबलचे हे पुस्तक विरोधकांनी वाचले. त्यातून नेरेटीव्ही सेट केला. संविधानानंतर मनुस्मृतीचे नाव घेऊन कोणी चतुरवर्णी. कसा होऊ शकतो. अशा पद्धतीने सत्तेची अघोरी भूक भागवण्याचा विरोधी पक्षाकडून प्रयत्न होत आहे. जनतेने अशा विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न जाता खरे काय ते समजून घेतले पाहिजे असेही मुनगंटीवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण देण्याबाबत सरकार संवेदनशील आणि सकारात्मक असल्याचे त्यांनी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.