यवतमाळ : दीड महिन्यापूर्वीच बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख झालेले व पालकमंत्री संजय राठोड यांचे कट्टर समर्थक गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेजंकीवार यांनी जिल्हाप्रमुख पदासह पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिला.
हेही वाचा >>> नागपूर : विधान परिषद निवडणूक, सर्व २७ उमेदवारांचे अर्ज वैध
पांढरकवडा तालुक्यात बेजंकीवार यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग आहे. शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताना सहकार्य, संवाद आणि विश्वास या कार्यसूत्रीने जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचा निश्चय केला होता. मंत्री संजय राठोड यांनीही याच पद्धतीने संघटन वाढवण्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, अवघ्या महिनाभरातच बेजंकीवार यांनी राजीनामा दिल्याने शिंदे गटातही धुसफूस असल्याचे बोलले जात आहे.