अकोला : जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होता. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्या नाराज नेत्यांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे बैठकही घेतली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हा प्रवेश थांबला होता. अखेर शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या मध्यस्थीने प्रवेश घेण्यात आले. माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, बादलसिंग ठाकूर, गजानन पावसाळे, संतोष अनासाने, भिकाराव उजाडे, कुणाल पिंजरकर, पप्पू चौधरी, संदीप पत्की, सुनील इंगळे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे कार्य केल्यावरही आता जुन्या, जाणत्या शिवसैनिकांना बाजूला केले जात असल्याची खंत व्यक्त करीत नेते व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला.

हेही वाचा – अमरावती : एका किलोमीटरच्या अंतरात किलोमागे ३० रुपयांनी महागतो कांदा

हेही वाचा – प्रवाशांसाठी आनंदवार्ता; १० नोव्‍हेंबरपासून पुणे-अमरावती-पुणे विशेष रेल्‍वेगाडीच्या १८६ फेऱ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनहितासाठी सतत कार्यरत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध विकासकामे वेगाने मार्गी लागत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन राज्यातून विविध पक्षांचे, संघटनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले जात आहेत. अकोला जिल्ह्याचे १९ वर्षे जिल्हाप्रमुख आणि उपमहापौर पद भूषवलेले श्रीरंग पिंजरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे विदर्भात पक्ष वाढीला जोमाने सुरुवात झाली. – रामेश्वर पवळ, राज्य समन्वयक, शिवसेना, (शिंदे गट).