नागपूर: नागपुरात राहणाऱ्या १६ व १८ वर्षीय दोन मुलींकडून खाप्याजवळील न्यू एकांत लॉजवर बळजबरीने देहव्यापार करवून घेतला जात होता. पोलिसांनी लॉजवर छापा घातला असता दोन्ही मुलींसोबत चार आंबटशौकीन ग्राहक ‘नको त्या अवस्थेत’ आढळून आले. पोलिसांनी लॉजमालक, ग्राहकांसह सहा जणांना अटक केली.

नागपुरातील “सेक्स रॅकेट’चे केंद्र असलेल्या बेलतरोडीत राहणाऱ्या १६ आणि १८ वर्षीय मुलींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले. दलाल पंकज नामदेव सरीले (२७, चिचोली. ता. पारशिवणी) याने दोन्ही मुलींना एका रात्रीचे २ हजार रुपये देण्याचा करार करून न्यू एकांत लॉजवर देहव्यापार करण्यासाठी आणले होते. लॉजमालक विनित देविदास पाटील (२९, सावनेर) याने दोन्ही मुलींना देहव्यापारासाठी एका खोलीत व्यवस्था केली. न्यू एकांत हॉटेल येथे जेवायला येणाऱ्या ग्राहकांना थेट मुलींना दाखविण्याची सोय विनीत पाटील करीत होता. त्यामुळे या लॉजवर गेल्या काही महिन्यांपासून आंबटशौकीनांची गर्दी वाढली होती.

हेही वाचा… चंद्रपूर : विजेच्या धक्क्याने दोन शेतकरी ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ वर्षीय पीडित मुलगी दहावीत असून तिच्याकडून बळजबरी देहव्यापार करवून घेतल्या जात होता. सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी अचानक लॉजवर छापा घातला. त्यावेळी दोन्ही मुलींवर चार आंबटशौकीन ग्राहक आरोपी सौरव विजय तिवारी (दहेगाव रंगारी), क्षितीज अनिल चौकसे (कामठी), सुरेंद्र लिलाधर होले (टीमकी, नागपूर) आणि संजय झिबल बिबरे (नवीन मानेगाव, खापरखेडा) हे नको त्या अवस्थेत आढळून आले, अशी माहिती खाप्याचे ठाणेदार मनोज खडसे यांनी दिली. चारही ग्राहकांसह लॉजमालक आणि दलालावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही मुलींची देहव्यापाराच्या दलदलीतून सुटका करण्यात आली.