नागपूर: अनके पश्चिम महाराष्ट्राचे नेते नोटंकी करीत आहे हे माझे वक्तव्य ते बच्चू कडूसाठी नव्हते तर महाराष्ट्रात होत असलेल्या नोटंकीबाज आंदोलन करणाऱ्याबाबत होते, असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
अमरावती मध्ये भाषण करताना बच्चू कडू यांच नाव घेतले नाही, उलट बच्चू कडू यांनी सांगितलेल्या बैठका आम्ही घेतल्या, दिव्यांग बांधवांचे महिन्याचे मानधन वाढवले आहे. रोज अनेक नौटंकी आंदोलन सुरू आहे.परवा दांडी यात्रा निघाली असल्याचे सांगून राज्यात असे आंदोलन सुरू आहे. त्यावर मी बोललो. गरीब माणसाचे कर्ज माफ झाले पाहिजे, त्यासाठी समिती गठीत केली आहे, आठ दिवसानंतर त्यासंदर्भात बैठक घेणार आहे असेही बावनकुळे म्हणाले.
महसूल विभाग देशातील क्रमांक एकचा होणार
नागपूर येथे झालेल्या दोन दिवसीय महसूल परिषदेमध्ये अधिकाऱ्यांनी जवळपास साडेतीनशे सुधारणा सुचविल्या आहेत. या सुधारणा लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील महसूल विभाग देशात क्रमांक एकचा विभाग होणार असल्याचे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
उद्या जरी निवडणूक झाल्यास आम्हीच जिंकणार
उद्या जरी स्थानिक स्वराज्य निवडणूक झाल्यास भाजप तयार आहे. प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बूथपर्यंत आमचे संघटन झाले आहे. सर्व जिल्ह्याच्या कार्यकारिणी पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मेळावे घेतो आहे. धाराशिव, बुलढाणा या भागात मी जाणार आहे, विधानसभामध्ये ५१.७८ टक्के मत घेऊन आम्ही जिंकलो होतों आता साठनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
त्यांना आता उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षात जे उरले सुरले कार्यकर्ते आहे ते पाच वर्षे सांभाळायचे आहे. त्यामुळे त्यांना आता हे, बदलणार आहे ते बदलणार आहे ,असे बोलावं लागत आहे. मतदार यादी चुकलेली, बोगस मतदान असे विषय घेऊन उद्धव ठाकरे बोलत असतात.निघून गेलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे, असे बोलतात, असेही बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत यांना खूप गंभीरपणे घेण्याची गरज नाही.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आता गेला. आता कायद्याचे राज्य आहे, हिंसाचार केल्यास सरकार चूप बसणार नाही कोण हिंसाचार करतो ते आम्ही बघू, किती धमक आहे ते पाहू. येथे कायद्याने राज्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध कोणी बोलत असेल तर आम्ही सहन करणार नाही हे यापूर्वी सांगितले आहे असेही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी रोज गांधी कुटुंबासोबत जेवण करावे , नाश्ता करावा आमची काही हरकत नाही. जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्माबद्दल त्यांच्या मतदारसंघात मत मिळवण्यासाठी असे वक्तव्य करत असतात. त्यांनी हिंदू धर्माबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य केले तरी ते निवडून येणार नाही. हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचा काम जितेंद्र आव्हाड यांनी करू नये, अशा पद्धतीचे आरोप केल्यास सनातन धर्म शांत बसणार नाही. कोणी कोणाचे राजकारण संपवत नाही, कोणी कोणावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा काम केले पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.