भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी ९ फेब्रुवारीपासून जामठा व्हीसीए स्टेडियमवर होणार असून तेथे प्रेक्षकांना जाता यावे म्हणून महामेट्रोने  सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रेमविरांनो ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेयसीऐवजी गायीला मिठी मारा; केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचा सल्ला

मेट्रोच्या ऑटोमोटिव्ह, बर्डी, प्रजापतीनगर या स्थानकांहून प्रेक्षकांना न्यू एअरपोर्ट मेट्रो किंवा खापरी स्थानकापर्यंत जाता येईल. तेथून जामठापर्यंत पोहोचण्यासाठी इ-रिक्षाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारपासून पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सामना चालग आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत मेट्रोने क्रिकेटप्रेमींसाठी दर १५ मिनिटांनी व दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान दर १२ मिनिटांनी मेट्रोची सोय केली आहे. 

हेही वाचा >>> “काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजत असाल तर…”, नाना पटोले यांचे नाव घेत सुनील केदार यांचे सूचक विधान

सामना संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना परत येण्यााठी दुपारी ३ ते ७ पर्यंत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या न्यू एअरपोर्ट व खापरी स्टेशनपासून व्हीसीएचे जामठा स्टेडियम अनुक्रमे ७ आणि ६ किमी अंतरावर आहे. या स्थानकांवरून जामठा येथे जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.  क्रिकेटप्रेमींनी मेट्रोच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामेटे्रोने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special metro train for india vs australia cricket match cwb 76 zws
First published on: 08-02-2023 at 19:25 IST