बुलढाणा मतदार संघातील नाट्यमय राजकीय घडामोडीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यामुळे शिंदे गटासह युतीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज गुरुवारी आमदार गायकवाड यांनी दुपारी २ च्या सुमारास अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक हजर होते. तर मित्रपक्ष राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी हजर नव्हते.

हेही वाचा… रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

हेही वाचा… अकोल्यात लढत दुरंगी की तिरंगी? दोन ठिकाणी ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेस…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता असतानाच आज गायकवाड यांनी तातडीने अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केला आहे.त्यांचे प्रस्तावक मृत्युंजय गायकवाड हे आहे.