राखी चव्हाण, नागपूर : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरण्याची शक्यता आहे. वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज (सोमवारी) दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली असून या बैठकीत धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित केला जाऊ शकत

हेही वाचा >>> पाकिस्तान : घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

राज्य वन्यजीव मंडळाची १७ वी बैठक ११ ऑक्टोबर २०२१ ला मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी ही बैठक होत आहे. ही बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईत करोनाचा वाढता प्रकोप बघता व्हिडीओ कॉनफारन्सिंगच्या माध्यमातून आज होत आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आजच्या १८ व्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या गेटवर तलवारी घेऊन घोषणाबाजी; भिंद्रनवालेचे पोस्टर झळकावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात कोणत्याही राज्यात धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले नाही. मागील बैठकीनंतर हे क्षेत्र शोधण्यासाठी अमरावती, नागपूर, पुणे-औरंगाबाद व कोकण-नाशिक विभाग अशा चार उपसमिती स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांचे अहवाल मंडळाकडे आले आहेत.
याशिवाय नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. तसेच कोलामारका, मुक्तीभवानी व महेंद्रीवर देखील अभयारण्याचे शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय अजेंड्यामध्ये भविष्यात १८ संवर्धन राखीव क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यावर देखील मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.