नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तरी राजकारणात काहीही होऊ शकते. भाजपा हा मोठा भाऊ असला तरी २०२४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होणार हे पक्के आहे. दादाच मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीस तसे बोलले आहे. त्यानंतर काही विषयच नाही. ‘समझनेवाले को इशारा काफी है’, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.

धर्मरावबाबा आत्राम नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री कोण होणार हे येणारा काळ ठरवेल. ज्याची संख्या अधिक त्याचा मुख्यमंत्री असे काही समीकरम आता राहिले नाही. २०२४ मध्ये दादा मुख्यमंत्री होणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे आणि प्रफुल पटेल यांचे तसे ठरले होते. त्यांनी हा जिल्हा मागून घेतला आहे. आम्हाला पक्षासोबत माहायुतीचे काम करायचे असल्याचे आत्राम म्हणाले.

हेही वाचा – कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट; शेतकरी चिंतेत, हिरवे स्वप्न…

प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधी खरेदी केले जाते. ई टेंडर प्रक्रिया प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाते. औषधांचा कुठेही तुटवडा नाही. गेल्या पाच-सहा दिवस सुट्टीचे दिवस होते. खाजगी रुग्णालयसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद होते, त्यामुळे अचानकपणे नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात गंभीर रुग्णांची संख्या वाढली. त्यात कमी वजनाचे बाळ असल्याने ती घटना घडली असल्याचे आत्राम म्हणाले.

हेही वाचा – थंडीची चाहूल! अनेक राज्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; भारतीय हवामान खाते म्हणते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेसळच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. तशा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे या चार महिन्यांत मोहीम राबवत असून त्यावर अंकुश लावण्यासाठी काम केले जाणार आहे. रेस्टॉरंट असो, मिठाईची दुकाने असो त्या त्या भागात जाऊन कारवाई केली जाणार आहे. विदर्भ हा सुपारीचा हब आहे. आतापर्यंत २ कोटी २४ लाखांची सुपारी जप्त केली आहे. चंद्रपूर आणि नागपुरात ही कारवाई झालेली आहे.