नागपूर : नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. कळमना ते कामठीदरम्यान गाडीवर रविवारी दगडफेक झाली होती.

हेही वाचा – नागपुरातील कोळसा व्यापाऱ्याला मागितली १ कोटीची खंडणी; तीन पत्रकारांसह चौघांना अटक

हेही वाचा – नागपूर : पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेसच्या सी ६ व सी १० डब्यावर कळमना ते कामठीदरम्यान दगडफेक झाल्याची माहिती नागपूर रेल्वे सुरक्षा दलास मिळाली. आरपीएफ पथकाने घटनास्थळी चौकशी केली असता जवळच्या वस्तीतील काही मुलांनी हे कृत्य केल्याचे समजले. याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.