बुलढाणा : कलेची देवता असलेला गणराया आबालवृद्ध भाविक प्रमाणेच कलावंतांचेही  लाडके दैवत. यामुळे कलावंत आपल्या परीने गणेशावर आधारित कलाकृती तयार करतात. बुलढाण्याच्या यंदाच्या गणेशोत्सवात गणेशांच्या मूर्तीचे विविध रूप पाहायला मिळत आहे. कलाविष्कारातून निर्माण करण्यात आलेल्या श्री गणेशाची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. 

हेही वाचा >>> बुलढाण्यात अवतरले ‘केदारनाथ’! रुद्र गणेश मंडळाचा देखावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाण्यातील साक्षी सुनील टेकाडे या विद्यार्थिनीने बंद पडलेल्या घड्याळी मधून बाप्पांचे दर्शन घडविले आहे. बंद पडलेल्या घड्याळीचा सदुपयोग कसा करता येईल असा प्रश्न साक्षीला निर्माण झाला.तिने मग बंद घड्याळीतून गणेशच साकारला.  यासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागला आहे. बंद घड्याळीमध्ये श्री गणरायाचे दर्शन घडवून आणण्याकरता साक्षीने ‘आक्रेलीक कलर्स’ चा वापर केला आहे.