राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल गुरुवारी जाहीर झाला असून यामध्ये शहरातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. दीक्षाभूमी स्थित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश चव्हाण याने गुणवत्तेची चुणूक दाखवत ७२० पैकी ६९० गुण मिळवत २५३ वी रँक मिळवली आहे.
याशिवाय प्रतीक्षा श्रीरामे हिने ६२० गुण, साहिल डंभारे ६०७ गुण, जुई क्षीरसागर ५८० गुण, आदिती टेंभूर्णीकर ५७९ गुण, मैथील रेवतकर ५५० गुण, अक्षय बावनकुळे ५३८ गुण प्राप्त करून नीट परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते, प्रेयसीवर पैसे उडविण्यासाठी चोरल्या १८ दुचाकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जारी केलेल्या निवेदनानुसार, यावेळी सर्वाधिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार हे उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वाधिक उमेदवारांनी नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यावर्षी नीट परीक्षेत सर्वाधिक १८ लाख ७२ हजार ३४३ उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १७ लाख ६४ हजार ५७१ म्हणजेच ९४.२ टक्के परीक्षेसाठी उपस्थित होते. ९ लाख ९३ हजार ५९ म्हणजेच ५६.३ टक्के उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.