वर्धा : जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या वर्धा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख गटाने सर्व जागा जिंकून निर्विवाद यश प्राप्त केले. आमदार रणजीत कांबळे गटास एकही जागा जिंकता आली नाही. बाजार समितीच्या निवडणुकीचे देशमुख गटाने उट्ट काढल्याची जिल्हाभर प्रतिक्रिया आहे.

विजयी उमेदवार असे – पंकज रमेश घोडमारे, सुरेश खंडागळे, संदीप राऊत, भाऊराव मगर, पुष्पा येंगडे, स्वाती लांबट, अनिल ठाकरे, संकेत निस्ताने, संदीप भांडवलकर, रमेश गायकवाड, सूरज गोहो, संतोष बोरकुटे, विठल खेकडे.

हेही वाचा – कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप कायम, आंदोलक मुंबईकडे निघाले

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात १०० ते १०९ वयोगटातील ६१६ मतदार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुसूचित वर्गातून उमेदवार न मिळाल्याने हे पद रिक्त राहिले. सहकार गटाने वर्धा बाजार समितीत कांबळे गटाने टाकलेला डाव परतवून लावला आहे. गटनेते प्रा. सुरेश देशमुख, शशांक घोडमारे, समीर देशमुख, शरद देशमुख यांनी हा विजय खेचून आणला.