लोकसत्ता टीम

यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यालगत सुन्ना येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी, नापिकी व वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त होऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उजेडात आली. राजू श्रीपाद जिड्डेवार (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

राजूने शेतातील आपट्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. राजू याची सुन्ना येथे टिपेश्वर अभयारण्याला लागुन सुन्ना गेट जवळच चार एकर शेती आहे. त्याच्या शेतातील पिकांचे प्रत्येक वर्षी अभयारण्यातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. याही वर्षी त्याच्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले होते. शिवाय अतिवृष्टीनेसुध्दा पिकांची नासाडी झाली. कापसाला योग्य भाव नसल्याने त्यातही आर्थिक नुकसान झाल्याने सोसायटीचे ४० ते ४५ हजाराचे कर्ज कसे फेडायचे व यंदा शेती कशी उभी करायची या चिंतेत तो होता.

हेही वाचा… “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले… 

आज तो शेतात मशागतीचे काम करीत असतानाच, त्याने अचानकपणे शेतातीलच आपट्याच्या झाडाला गळफास लावुन आपली जिवनयात्रा संपविली. मृतक राजुच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.