लोकसत्ता टीम

नागपूर: माजी मंत्री सुनील केदार यांना शुक्रवारी (२२ डिसेंबर) पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी सूत्रे हलवली. मात्र उशिरा निर्णय आल्यामुळे जामिनावर सुनावणी २६ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा सुनील केदार यांची प्रकृती बिघडली. त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अतिदक्षता विभागात दाखल केले गेले.

सुनील केदार यांना रात्री उशिरा आरोग्याबाबत त्रास सुरू झाला. त्यांनी ‘मायग्रेन’मुळे तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आहे. येथे डॉक्टरांनी ‘इसीजी’ काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आतचे, हे तपासले जात आहे. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा-अमरावती : आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाची ट्रॅक्‍टरला धडक; एक ठार, पाच जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान न्यायालयाने केदार यांना शुक्रवारी सकाळी गुण्यात दोषी ठरवले आणि निर्णय सायंकाळी दिला. सायंकाळी निर्णय देतानाही बराच कालावधी लागला. सायंकाळी उशिरा निर्णय आल्यामुळे जामिनाच्या अर्जावर पूर्ण सुनावणी होऊ शकली नाही. पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळची सुट्टी असल्याने जामिनासाठी न्यायालयाने २६ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. यामुळे सुनील केदार यांची निदान काही रात्र तरी कारागृहात जाणार आहे. दरम्यान शनिवारी केदार यांच्या मेडिकलमध्ये आणखी काही वैद्यकीय तपासणी होणार आहेत. त्यात केदार यांच्या आजाराबाबत ठोस कळणार असल्याने डॉक्टरांनी सांगितले.