नागपूर : महाराष्ट्रात आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व दिले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली.

इतिहासतज्ञानी ज्याप्रमाणे वाघनाखाबाबत भूमिका मांडली आहे त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे देशातील लहान मुलांनासुद्धा माहीत आहे. पक्ष शरद पवार यांनी बांधला आहे. मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारी नोकरीमध्ये किती संख्या आहे हे मला माहित नाही. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांनी त्यावर उत्तर दिले पाहिजे. आकडेवारी जी आली ती कोणी आणली. डेटा हा सरकारकडे असतो. माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्याची माहिती मागवता येईल, मात्र त्याचे उत्तरसुद्धा सरकार देत नसल्याचे सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – आदिवासींच्या आंदोलनाने गडचिरोली दोन तासांपासून ठप्प, भाजप आमदारांचा सर्वांसमक्ष पाणउतारा…

हेही वाचा – चंद्रपूर : वीज पडून एक ठार, दोघ जखमी; मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल तर राज्य व केंद्र सरकार करत आहे. यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, मात्र पक्ष फोड, नेते फोड यातच त्यांचा वेळ जातो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.