नागपूर: प्रसिध्द अभिनेता सुशांतसिंग राजपुत यांनी २०२० मध्ये आत्महत्या केली होती. परंतु, बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी त्यांची आत्महत्या नसून हत्या करण्याचा आरोप करण्यात आला होता. याचा तपास मुंबई पोलिसांनी केला असता त्यात स्पष्टपणे समोर आले की, त्याने आत्महत्याच केली. नंतर हा तपास सीबीआयला देण्यात आला. सीबीआयचा अंतिम अहवाल आता समोर आला असून त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार सुशासिंग राजपुत याने आत्महत्याच केल्याचे समोर आले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते व तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

मी राज्याच्या गृहमंत्री असतांना सुशांतसिंग राजपुत यांनी आत्महत्या केली होती. परंतु तेव्हाच्या विरोधकांनी आरोप केला होता की, राजपुत यांची आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास बांद्रा पोलिसांनी सुरू केला. तपास सुरू असताना अनेक बाबी समोर आल्यानंतर मी वारंवार सांगत होतो की, सुशांतसिंग यांची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला अहवाल सादर केला. त्यातही सुशांतसिंग यांची हत्या करण्यात आली नसून त्यांनी आत्महत्याच केल्याचे समोर आले होते.

सुशांतसिंग हा मुळचा बिहारचा होता. आणि त्यांचा आत्महत्येचा फायदा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कसा घेता येईल यासाठी विरोधकांकडून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला. सुशांतसिंग यांच्या वडीलांनी पाटणा येथे तक्रार देऊन सुशांतसिंग याची हत्या करण्यात आल्याची तसेच रिया चक्रवर्ती हिने १५ कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला होता. यावरुन या प्रकरणाचा तपास हा सीबीआयला देण्यात आला. आता सीबीआयचा अंतिम अहवाल आला असून यात सुशांतसिंग यांची हत्या करण्यात आली नसून आत्महत्याच असल्याचे समोर आल्याने तेव्हाचा मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा योग्य होता असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिया चक्रवर्तीला क्लिनचीट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचे सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिया चक्रवर्ती विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्याने तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. तब्बल चार वर्ष चार महिन्यांनी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचे म्हटले आहे.