वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर नांदेड बसचा देवळी येथे अधिकृत थांबा आहे. मात्र थांबा नसल्याचे कारण देत चालक व वाहकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत हुज्जत घातली. वर्धा स्थानकावर अशी अरेरावी झाल्याने मुलींनी संतप्त होत बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यास भाग पाडत तक्रार नोंदविली.

हेही वाचा – हिवाळी अधिवेशनातील आश्वासनांची पूर्तता नाहीच; राज्य सरकारकडून नुसत्याच घोषणा

हेही वाचा –  ‘भोसला’वर सरकारची कृपादृष्टी; नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रासाठी आणखी ४२ एकर जागा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंडळाच्या वरिष्ठांनी चौकशी केली. त्यात चालक संजय राजेश मेहेत्रे व वाहक भरत रमेश पराते यांना निलंबित करण्याची कारवाई झाली. संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी विद्यार्थिनींना झालेल्या मनस्तापाची दखल घेत हे प्रकरण उचलून धरले होते. देवळी मार्गे नागपूर किंवा यवतमाळ दिशेने जाणारी प्रत्येक बस देवळी स्थानकात यावी व नंतरच पुढे जावी, अशी मागणी होते.