नागपूर : दक्षिण नागपुरात जयमाता प्रा. शाळा, दिघोरी येथे बूथ क्रमांक ४६ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मतदान केंद्रावर १ तास १० मिनिट उशिरा मतदान सुरू झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळी गर्दी झाली होती. 

दक्षिण नागपुरात सकाळी सात वाजता मतदान सुरू होण्याच्या आधी जय माता प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर मशीन तपासणी केली असता त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. या केंद्रावर सकाळी सात वाजेपासूनच मतदार रांगेत होते मात्र मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आल्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर नवीन मशीन आणून जवळपास एक तास उशिरा मतदान सुरू करण्यात आले. मात्र लोकांच्या केंद्रावर रांग लागली होती.

nagpur illegal hoardings marathi news
नागपूरमध्ये रेल्वेच्या जागेतील सर्वच जाहिरात फलक अवैध
The number of brain-dead organ donors in the sub capital is over 150
उपराजधानीत मेंदूमृत अवयवदात्यांची संख्या दीडशेवर; चालू वर्षात उच्चांकाकडे वाटचाल
Shivajinagar, voters, BJP,
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगरमधील मतदारांमध्ये निरुत्साह? आतापर्यंत अवघे २३.२६ टक्के मतदान
Arguments between police and voters at many places due to the ban on entry into polling stations with mobile phones
मोबाईलसह मतदान केंद्रात प्रवेशबंदीवरुन अनेक ठिकाणी पोलीस व मतदारांमध्ये वाद
in Mumbai 11 thousand houses sold in April decrease in house sales compared to March
मुंबईतील ११ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री, मार्चच्या तुलनेत घर विक्रीत घट
jobs
नोकरीची संधी
Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह

हेही वाचा…नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…

दरम्यान केंद्रावर आता मतदान सुरू झाले असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.या भागातील माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी १ तास मतदान सुरु झाल्याचा आरोप करत सायंकाळी एक तास वाढवून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.