नागपूर : मातृभाषेतून शिक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला. त्यामुळे आता सर्व विद्यापीठांमधील विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तके आता विद्यार्थ्यांना मराठीतदेखील उपलब्ध होतील.

त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत विद्यापीठांना देण्यात आली आहे. कारण हा निर्णय घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तक उपलब्ध झाली नसल्याचे चित्र आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत विज्ञान आणि वाणिज्य शाखेची मराठीत ट्रान्सलेट केलेली पुस्तकं विद्यापीठांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत.

हेही वाचा – नागपूर : हिनासमोरच पती व भाऊ दोघेही करायचे चिमुकलीवर लैगिक अत्याचार

हेही वाचा – वाघाच्या डरकाळ्यांनी गावकरी भयभीत; वनविभाग अलर्ट मोडवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये इंग्रजी अभ्यासक्रम लवकर आत्मसात करण्यास अडचण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेकदा अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने मातृभाषेतून शिक्षण घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यास मदत होईल. अभ्यासक्रमातील विविध बाबींच्या संदर्भासाठी मराठीत ट्रान्सलेट केलेली ही पुस्तकं उपयोगात पडणार असल्याचे म्हटले जात आहे.