नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात उमेदवार द्यायचा किंवा अपक्षला पाठिंबा द्यायचा याबाबत कॉंग्रेसने अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज दाखल करून कॉंग्रेसवर एकप्रकारे मात केली आहे.

शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी आहे. आत्तापर्यंत भाजप आणि कॉंग्रेसने अद्याप आपल्या उमेदवाराची किंवा समर्थनाची घोषणा केली नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढणार, असे जाहीर करण्यात आले. असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा >>> “पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर सावधान…”, काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलांचे नाना पटोलेंचे संकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामराव चव्हाण असे उमैदवाराचे नाव असून त्यांच्या अर्जावर ते उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस ने उमेदवार दिला तर चव्हाण यांचे काय? असा प्रश्न निर्माण होणार आहे. चव्हाण चंद्रपूरचे असून तेथे सर्वाधिक दुस-या क्रमांकाची मते आहेत.