लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवछत्रपती राज्याभिषेक दिन ६ जुनला दक्षिण अमेरिकेतील त्रिनिदाद आणि टोबॅगो देशातही साजरा होईल. येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार आहे.

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सेवा दिलेले व सध्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात कार्यरत डॉ. अरविंद कुऱ्हाडे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे. दक्षिण अमेरिकेतून डॉ. कुऱ्हाडे लोकसत्ताशी भ्रमनध्वनीवर बोलतांना म्हणाले, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फाॅर कल्चरल कार्पोरेशन (एमजीआयसीसी), भारत सरकार, त्रिनिदाद आणि टोबॅगो देश, मराठी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

हेही वाचा… अमरावती: अश्‍लील व्हिडीओ बनवून महिलेच्‍या होणाऱ्या पतीला पाठवले

कार्यक्रमात त्रिनिदात आणि टोबॅगो देशातील मराठीसह इतरही भारतीय सहभागी होतील. गेल्यावर्षीपासून या पद्धतीचा कार्यक्रम येथे सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. डॉ. गिता कुऱ्हाडे करणार आहे. कार्यक्रमात प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीनेही सहभागी होणे शक्य असल्याचेही डॉ. कुऱ्हाडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The 350th shiv chhatrapati shivaji maharaj coronation day will be celebrated in the south american country on 6 june mnb 82 dvr
First published on: 01-06-2023 at 17:27 IST