शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटक रंजना पौळकर यांच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी वीस लाखांची सुपारी कबूल करून प्रत्यक्ष पंचवीस हजार रुपये दिल्याची बाब पोलीस तपासातून उघड झाली आहे. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- संघ मुख्यालय परिसरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटक रंजना पौळकर यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अब्दूल वाजीद याला अटक केली होती. त्यांची सखोल चौकशी केली असता सदर गुन्ह्यात अब्दुल जुबेर अब्दुल जब्बार, शेख नूर, भगवान शंकर वाकुडकर, नितीन संजय कावरखे यांना अटक केली होती. हे सर्व चाकूहल्ला प्रकरणाच्या कटात सामील असल्याचे उघड झाले. त्यानंतर या आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य हल्लेखोर फरार होता. पोलिसांनी मुख्य हल्लेखोराचा शोध घेऊन अखेर अटल काशीनाथसिंग यादव याला बिहार येथून अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा- नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचे छापे; मध्य भारतात खळबळ

या प्रकरणातील हल्लेखोर आरोपी अटल काशीनाथसिंग यादव व अब्दुल वाजीद यांची अकोला कारागृहात वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा भोगत असताना ओळख झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासातून या हल्यामागचा मुख्य सूत्रधार शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख सुरेश मापारी असून त्यानेच २० लाख रुपयाची सुपारी दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे जाधव व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेख उपस्थित होते.

हेही वाचा- …अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा

यापूर्वीही झाला होता हल्ला

सहा महिन्यांपूर्वी रंजना पौळकर दुचाकीवरुन जात असताना अनसिंग परिसरात त्यांचा अपघात झाला होता. मात्र, तो अपघात नसून घातपात होता व याप्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accused who attacked thackeray groups washim district women chief ranjana paulkar with a knife was arrested from bihar dpj
First published on: 01-12-2022 at 20:44 IST