नागपूर: डाव्या विचारसणीने देशात आणि देशातील शैक्षणिक परिसरात नकारात्मकतेचे वातावरण निर्माण केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अनास्था निर्माण झाली आहे.

परिणामी, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावत आहे, असा आरोप करीत महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी १२ जानेवारीपासून देशभर ‘चलो कॅम्पस’ अभियान राबवले जाईल, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आली.

हेही वाचा… जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुसदमध्ये गुन्हा दाखल; प्रभू श्री रामांबाबतच्या वक्तव्यामुळे अडचणीत वाढ

अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटक प्रफुल्ल आकांत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, मागील ७५ वर्षांपासून शैक्षणिक वर्तुळात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम अभाविप करीत आहे. अभाविपचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे औचित्य साधून १२ जानेवारीपासून देशभरात ‘चलो कँपस’ अभियान राबविले जाणार आहे. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती हा चिंतेचा विषय आहे. महाविद्यालय हे ऊर्जा निर्माण करणारे केंद्र व्हावे, संस्कार केंद्र व्हावे, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढून त्यांची उपस्थिती वाढावी हा या अभियानमागचा उद्देश आहे. यासाठी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, महाविद्यालय प्रशासन या सर्व घटकांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचा… वडिलांनी तीन वर्षांच्या मुलास तेलंगणात विकले; आर्णी येथे आंतरराज्यीय मानवी तस्करी उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन होईल. भारतीय भाषांमध्ये आता डॉक्टर, अभियंता, वकील होता येईल. शिक्षण पद्धती भारतीय भाषेत उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणात सहभाग वाढेल, असा विश्वासही आकांत यांनी व्यक्त केला.